Share

वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार

Published On: 

औरंगाबाद : शहरात कोरोनाचे रूग्ण वाढतांना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गेल्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मनपाचे कोविड सेंटर्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले होते. जसजशी गरज पडेल तसतसे हे सेंटर्स पूर्ववत सुरु केले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. आजपासून (दि.१९) किलेअर्क आणि एमजीएम येथील कोविड सेंटर्स रुग्णांसाठी सुरु होतील.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिकेने उपाययोजना अधिक कडकपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील मेल्ट्रॉन व पद्मपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये १८७ रुग्णांवर उपचार केले जात आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने यात आणखी दोन कोविड सेंटर्सची भर आजपासून पडणार आहे. आजपासून (दि.१९) किलेअर्क आणि एमजीएम येथील कोविड सेंटर्स सुरु होणार असल्याचे पाडळकर यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला तर त्याच्या संपर्कातील १९ व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी केली जाणार आहे. शहरातील १५ आरोग्य केंद्र आणि दोन कोविड सेंटरमध्ये दररोज एक हजार नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. पहिला डोस घेतलेल्या दोन डॉक्टरांना कोरोना संसर्ग झालेला आहे. या दोन्ही डॉक्टरांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!