Share

‘डोंबिवली गँगरेप प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार’

Published On: 

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला असुरक्षित असल्याचे सांगत विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी इतर राज्यातील घटनांचा दाखला देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे दिसून येत आहे.

14 वर्षीय मुलीवर गँगरेप झाल्याची घटना डोंबिवलीतील भोपर परिसरात समोर आली आहे. बॉयफ्रेण्डने बलात्काराचं व्हिडीओ शूट करत ब्लॅकमेल केल्यानंतर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 33 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यामधील 28 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर पाच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

दरम्यान, डोंबिवलीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील उर्वरीत आरोपींना अटक करण्यात यावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली होती. ही मागणी आता मान्य झाली असून डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकारांना दिली. आतापर्यंत या घटनेतील 33 आरोपींची नावे समोर आली असून त्यातील 27 जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!