Share

धारूर बाजार समितीमधील वाद पुन्हा आले चव्हाट्यावर

Published On: 

🕒 1 min read

बीड: धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या पंधरा दिवसांपासून संचालकांच्या राजीनामा नाट्यामुळे चर्चेत होती. ती चर्चा थांबली नाही तोच बाजार समितीचे कार्यकारी मंडळाची ऑनलाइन बैठक २४ एप्रिल रोजी बोलवण्यात आली आहे, मात्र आता ही बैठक रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. बाजार समितीचे संचालक चिंतामणी सोळंके यांनी कली आहे. यामुळे बाजार समितीमधील संचालकांतील वाद पुन्हा एकदा समोर आल आहे.

बाजार समितीच्या दोन संचालकांनी पंधरा दिवसांपूर्वीच राजीनामे देत बंड केले होते. यावरून सुरू झालेली चर्चा थांबत नाही तोच आता झुम मीटिंगला एका संचालकाने विरोध केला आहे. यामुळे धारूर बाजार समितीत सर्व काही अलबेल आहे, असे दिसत नाही. संचालकांच्या राजीनामा नाट्यामुळे चर्चेत होती. ती चर्चा थांबली नाही तोच बाजार समितीचे कार्यकारी मंडळाची ऑनलाइन बैठक २४ एप्रिल रोजी बोलवण्यात आली आहे. यांचा अजेंड्यात नवीन नोकरभरतीसाठी उपसमिती नेमणे, नवीन बांधकामाची बिले काढणे हे विषय ठेवण्यात आले आहेत.

आवश्यक व महत्त्वपूर्ण विषयासाठीच बैठक घ्यावी असे आदेश असताना गैरप्रकार करण्यासाठी गडबडीत बैठक घेऊन विषय मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संचालक चिंतामण सोळंके यांनी केला आहे. हा प्रकार गैर असून अनेक संचालकाकडे अँड्रॉईड मोबाइल नाहीत. अनेक सदस्यांना झुम अॅप वापराबाबत पुरेशी माहिती नसल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत. काही संचालकांच्या गावात मोबाइलची रेंज नाही. या सर्व बाबीचा विचार करून ही २४ एप्रिलची बैठक रद्द करावी, आशी मागणी बाजार समितीचे संचालक सोंळके यांनी बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. जर ही बैठक घेतली व हे ठराव घेतले तर सर्वस्वी जबाबदार सभापती व सचिव राहतील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!