Share

राज्यमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालयाची बिकट अवस्था; भाजपचे गांधीगिरी मार्गाने आंदोलन!

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार ढेपाळला असून रुग्ण सुविधा अत्यंत बिकट बनली आहे. रुग्णवाहिका असून वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गुरुवारी भाजपच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई यांना घेराव घालत लहान मुलांची खेळण्याची रुग्णवाहिका भेट देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या रूपाने सिल्लोड मध्ये शिवसेनेचे प्राबल्य असूनही रुग्णवाहिका नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उपजिल्हा रुग्णालयाला तीन रुग्णवाहिका आहेत, परंतु गरज पडल्यास एकही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यात रुग्णालयाच्या परिसरात कचरा साचला असून दुर्गंधी पसरलेली आहे. अस्थिरोग विभाग बंद असल्याने रुग्णांना औरंगाबादला पाठवण्यात येते. असा आरोप करीत भाजपच्या वतीने घेराव घालत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आ. सांडू पा. लोखंडे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, माजी सभापती अशोक गरुड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

रेफर सेंटरवर नियंत्रण नसल्याने रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका मिळत नाही. यामुळे रुग्णांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यात काही विभाग बंद असल्यामुळे रुग्णांना रेफर केले जाते. हे उपजिल्हा रुग्णालय नव्हे तर रेफर सेंटर बनले आहे, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. विकासाच्या वर वर गप्पा करणारे सत्तार यांनी रुग्णालयासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देऊ नये. असा प्रश्न विचारत विरोधक त्यांची कोंडी करू पाहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!