Share

‘काँग्रेसमध्ये मला अशी वागणूक तर सामान्य कार्यकर्त्याचं काय होत असेल?’

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपले मुख्यमंत्री विविध राज्यांमध्ये बदलले. मात्र ज्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले त्यांनी बंडखोरीची भाषा केली नाही. पंजाबमध्ये आता काँग्रेसला कॅप्टन बदलावा लागला. अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा लागला, पण सिंग यांनी मुकाट्याने पद सोडले नाही. त्यांनी आता काँग्रेसविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला होता. तर आता यानंतर आता अमरिंदर यांनी पक्षात आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर सामान्य कार्यकर्त्याचं काय होत असेल, असा सवाल केला आहे. काँग्रेसमध्ये रागाला स्थान नाही, पण अपमान आणि छळासाठी आहे? असं म्हणत पुन्हा एकदा अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

तसेच आता अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धू विरोधात थेट मोर्चा उघडला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धूला पराभूत करण्यासाठी त्याच्याविरोधात एक प्रबळ उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!