नवी दिल्ली : क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबने बॅट्समन या शब्दाला बदलण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट खेळताना आता बॅट्समन ऐवजी बॅटर शब्दाचा प्रयोग करावा लागणार आहे. खेळामध्ये कोणत्याही प्रकारचे लिंगभेद होऊ नये यासाठी एमसीसीने हे नियम बदलेले आहे. यावर लगेच अंमलबजावणी होणार आहे.
महिला क्रिकेटने जागतिक स्तरावर प्रगती केली आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाउल उचलल्याचे एमसीसीने सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयाधीच काही संस्थांनी बॅट्समन ऐवजी बॅटर या शब्दाचा वापर सूरु केला आहे. क्रिकेटमध्ये बॅट्समन हा शब्द लिंगभेदी होता. त्यामुळे तो बदलण्यात आला आहे. मात्र बॉलर आणि फिल्डर हे शब्द तसेच वापरले जाणार आहे. हे फक्त इंग्रजी भाषेसंबंधी करण्यात आले आहे. कारण मराठी भाषेत आधीपासूनच महिला आणि पुरुषांना फलंदाज आणि गोलंदाज असे सारखेच शब्द वापरले जातात जे कुठल्याही प्रकारचे लिंगभेद दर्शवत नाही.
२०१७ मध्ये आयसीसीने आणि महिला क्रिकेटशी संलग्नित काही विशेष अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे आता महिला आणि पुरुष या दोघांना बॅटर म्हणूनच संबोधले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- कमालच ! सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होण्याआधीच ‘या’ तारखेपर्यंतच तिकीट फुल्ल
- ‘परवा एका एकराला 18 कोटी दिले; आता लोकं भेटून सांगतात, दादा रस्ता तेवढा आमच्या शेतातून न्या’
- ‘…मग हे कसले घंट्याचे बेस्ट CM ?’ निलेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर विखारी टीका
- मोदी सरकारचा निषेध करणार का? सावंतांचा फडणवीसांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

