मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मराठवाड्यात दौऱ्यावर आहेत. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ते आढावा घेत आहेत. मात्र, या दरम्यान उस्मनाबादमध्ये पाऊस सुरू असल्याने त्यांनी गार्ड ऑफ ऑनर नाकारला. सोशल मीडियासोबतच काही वृत्त वाहिन्यांवर त्या बाबत कौतूक होत आहे. मात्र, या दरम्यान बीड जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी महिला त्यांना निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिला नाही. यावरुन भाजप नेते नीलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केलीय.
या संदर्भातला व्हीडीओ नीलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. अजित पवारांचा ताफा काही महिला अडवत असल्याचे या व्हीडीओमध्ये दिसत आहे. मात्र, सुरक्षा कर्मचारी या महिलांना अडवत असल्याचे दिसत आहे. या महिला आरोग्य कर्मचारी असून उपमुख्यमंत्र्यांना आपले निवेदन देण्यासाठी आल्या असल्याचा दावा नीलेश राणे यांनी या माध्यमातून केला आहे. अजित पवारांकडे विचारपूस करण्यासाठी जी माणुसकी लागते ती सुद्धा नसल्याची टीका या माध्यमातून राणे यांनी केली आहे.
बीड मधे उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलाना काय वागणूक मिळाली बघा. अजित पवारांनी 'Guard of honour' पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मिडीयावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे 10 सेकंड थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही. pic.twitter.com/GudrUCfrcg
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 18, 2021
या संदर्भामध्ये त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘बीड मधे उपमुख्यमंत्री यांना आरोग्य कर्मचारी निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलाना काय वागणूक मिळाली बघा. अजित पवारांनी ‘Guard of honour’ पावसामुळे नाकारला म्हणून त्यांचं काही मिडीयावाले कौतुक करतायत पण अजित पवारांकडे १० सेकंड थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही.’
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमध्ये चितपट करू; भाजप नेत्याने थोपटले दंड
- अखेर ठरलंच ! विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याने केलं महत्वाचं विधान
- गोपीनाथ मुंडे असते तर अशा पद्धतीने ओबीसींचे आरक्षण रद्द होऊच दिले नसते
- ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर ‘हा’ कसा असेल’; खडसेंचा सवाल
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर


