Share

साताऱ्यातील ‘या’ कर्तुत्ववान नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी देण्याची होतेय मागणी

Published On: 

🕒 1 min read

सातारा – महाराष्ट्रात सध्या राज्यपालनियुक्त विधानपरिषद जागांची चर्चा आहे. बारा जागांसाठी महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना- राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षात अद्याप कुणी किती जागा घ्यायच्या यावर अजून एकमत झालेले नाही. मात्र या जागांवर वर्णी लावण्यासाठी अनेकांकडून फिल्डिंग लावली जात आहे.

विधान परिषदेवर राज्यपालांकडून १२ जणांची नेमणूक केली जाणार आहे. क्रीडा, कला, सांस्कृतिक, साहित्य अशा क्षेत्रातील व्यक्तींसाठी असलेल्या या जागांवर अनेकांचा डोळा आहे. बहुतांश वेळा सरकारने शिफारस केलेल्या कोण्याही व्यक्तींची राज्यपालांनी नियुक्ती करण्याची पद्धत अलिकडे प्रचलित झाली होती. पण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमांचे पालन करणारे असल्याने महाविकास आघाडीला आता नावे निवडताना सरकारमधील तीनही पक्षांची मोठी कसरत आहे.

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या देखील नावाची चर्चा सुरु झाली आहे. संजीवराजे यांच्या कार्यकतृत्वाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी फलटणकरांच्यावतीने येथील पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी केली आहे.

दरम्यान,लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चर्चा झाली. पण, उमेदवारी काही मिळाली नाही. आता सुरेखा पुणेकर विधानपरिषदेला तरी उमेदवारी मिळेल, अशी आशा बाळगून आहेत. ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना आयुष्यभर लोककला जपणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी सर्वच पक्षांना आपणास उमेदवारी द्यावी अशी विनंती केली आहे. जर पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर कमीत कमी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी तरी माझ्या नावाचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याची पुणेकर यांचा संपर्क होऊ शकला नाही. गरज पडली तर पवारांची भेट देखील घेऊ असं त्या म्हणाल्या. याशिवाय शिवसेनेकडून देखील उमेदवारी मिळेल अशी आशा पुणेकर यांना आहे.

आमचं ठरलंय… माध्यमांनी भांडणे लावण्याची कामे करू नये ’

वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बनला बिग बॉसच्या घरच्यांचा लाडका

वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेला आरोह वेलणकर बनला बिग बॉसच्या घरच्यांचा लाडका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!