🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- सध्या शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून धुसफूस सुरु असल्याचे चित्र आहे. यामुळे युती होईल कि नाही याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची चाचपणी देखील सुरु असल्याचे बोलले जात आहे मात्र या प्रकारावर माजी मंत्री सुरेश जैन यांनी भाष्य करत माध्यमांना दोन्ही पक्षांमध्ये भांडण न लावण्याचा सल्ला दिला आहे.
विधासभेत भाजप-शिवसेना युती आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दुसऱ्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम आम्हाला करावे लागेल, हे आमचे ठरले आहे. अशावेळी माध्यमांनी आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला माजी मंत्री सुरेश जैन यांनी माध्यमांना दिला आहे. मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजी महोत्सवात पत्रकारांशी बोलत होते. या भजी महोत्सवात सुरेश जैन व पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले जैन ?
आमची युती आहे. त्यामुळे कुणाला तरी एकालाच उमेदवारी मिळेल. आमच्यात ठरले आहे की, ज्याला उमेदवारी मिळेल. त्याचे काम दुसऱ्याला करावे लागेल. त्यामुळे आमच्यातील गोडवा विधानसभेपर्यंत टिकेल. फक्त मीडियाने आमच्यात भांडण लावू नये, असे मिश्किल उत्तर दिले.

