🕒 1 min read
मुंबई : चित्रपट, वेब सिरीज, मालिका यामध्ये महत्वाचा रोल(भूमिका) देण्याचे आमीष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये असे गैरप्रकार वाढत असून ते रोखण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेने असा गैरप्रकार करणाऱ्या परप्रांतीयांना चांगलीच अद्दल घडवली आहे.
याबाबत मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांनी फेसबुकवर व्हिडीओ टाकून माहिती दिली आहे. मुलींना चित्रपटा मध्ये रोल देण्याचे आमीश दाखवून त्यांच्याकडून शारीरिक संबंध निर्माण करण्याची जबरदस्ती करणाऱ्या डायरेक्टर आणि कास्टिंग डायरेक्टरला मनसे स्टाईल चोप दिला. भूमिका मिळवण्यासाठी प्रोड्युसर(निर्माता)ला खुश करावं लागेल, ठाण्यातील हॉटेल ला येऊन लखनऊ वरून येणाऱ्यासह तिघांसोबत रात्र घालवावी लागेल, असा फोन करून त्यांनी गैरवर्तन केले असल्याचे पद्मनाभ राणे यांनी सांगितले.
https://www.facebook.com/padmanabh.rane/videos/350607710118502/
अशा प्रकरणांना अनेक मुली बळी पडतात अथवा त्या लांब जातात, मात्र एका मुलीने घाबरून न जाता मनसेशी संपर्क करून अशा गैरप्रकरणांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला. याबाबत मनसेतर्फे कौतुक करण्यात आले. यातील यादव नामक व्यक्ती हा शिवसेना चित्रपट सेनेचा पदाधिकारी असल्याचे सांगत असून आमदार-खासदारांशी ओळख असल्याची भीती घालत असल्याचे देखील समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राच्या निर्णयामुळे एमबीबीएसच्या १५०० तर पदव्युत्तरच्या २५०० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- ‘आमच्या पंतप्रधानांनी सातशे कोटी रुपये पाठवले तरी तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?’
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
