Share

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेपुर्वी न्युझीलंड क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १७ ऑक्टोबर पासुन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवीण्यात येईल.

मगंळवारी १७ ऑगस्ट रोजी आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रक जाहीर होण्यापुर्वी न्युझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पर्धेच्या अनुषंगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. न्युझीलंड क्रिकेट बोर्डाने माजी वेगवान गोलंदाज शेन बॉंडचा आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी कोचींगच्या स्टाफमध्ये निवड केली आहे. तसेच टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारताविरुद्धच्या मालिकेतीही तो मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड, फलंदाजी प्रशिक्षक ल्युक रॉंची आणि गोलदांजी प्रशिक्षक शेन जर्गेनसेन यांच्या सोबत कोचींग स्टाफचा सदस्य असणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे शेन बॉंड हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार असल्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेपुर्वी तो युएईत उपस्थीत असणार आहे. जुन महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव केला होता. आता त्यांचे पुढील लक्ष्य आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!