नवी दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. आज उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान मोर्चा संघटनेच्या वतीने किसान महापंचायत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील सर्वात मोठ्या GIC मैदानात ही पंचायत आयोजित करण्यात आली आहे. देशातील विविध राज्यातून याठिकाणी शेतकरी सहभागी झाले आहेत.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून कृषी कायदे तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांना घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. टिकैत यांच्या या घोषणेनंतर आता केंद्र सरकारच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत.
दरम्यान आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत ट्वीट करत एका ओळीत केंद्रातील मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. ‘गूंज रही है सत्य की पुकार, तुम्हें सुनना होगा अन्यायी सरकार’ असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. तर दुसरीकडे भाजप नेते वरूण गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
महापंचायतीची एक व्हीडिओ क्लिप ट्विटरवर शेअर करताना वरूण गांधी म्हणाले, ‘मुजफ्फरनगरमध्ये आज लाखो शेतकरी आंदोलनासाठी जमा झाले आहेत. तीसुद्धा आपलीच माणसं आहेत. आपण त्यांच्याशी आदरपूर्वक पद्धतीने संवाद साधण्याची गरज आहे. त्यांचं दुःख आणि मुद्दे समजून घेण्याची गरज आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.’ असे मत त्यांनी ट्वीट करून माडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पेंग्विनवरुन राजकारण करणारे पेंग्विन पाहून मजा घेतात; महापौरांचा टीकाकारांना टोला
- किसान महापंचायतीला भाजप नेते वरूण गांधी यांनी दिला पाठिंबा, म्हणाले…
- ‘इन्फोसिसचे देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान’; ‘त्या’ वादग्रस्त स्टोरीनंतर संघाचे स्पष्टीकरण
- शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार ; किसान महापंचायतीला मुजफ्फरनगरमध्ये झाली सुरुवात
- ‘सत्तेसाठी लाचार शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली’, आ. सावे यांचे दानवेंना प्रत्युत्तर!


