Share

‘माझ्याकडे काँग्रेस अंतर्गत गटबाजी संपवण्याचा फॉर्म्युला’, नाना पटोलेंचा दावा

Published On: 

नागपूर : गटबाजी कोणत्या पक्षात नाही. भाजपमध्ये गटबाजी नाही काय? पण माझ्याकडे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपवण्याचा फॉर्म्युला तयार आहे. लवकरच त्याचे रिझल्ट मिळणे सुरू होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नागपूर येथे ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना त्यांनी पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य केले.

पटोले म्हणाले, माझ्यामुळे दुसरे अस्वस्थ होतात. त्यामुळे मी अस्वस्थ होण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस कार्यकारिणीत सहमतीने निर्णय झाला आहे. थोडेफार मागे पुढे होतच असते. माझ्याच काय कोणाच्याही मनासारखे शंभर टक्के होत नाही. त्यामुळे मी अस्वस्थ आहे, असे म्हणण्याला काही अर्थ नाही. कार्यकारिणीत ओबीसीला पहिल्यांदा ३३ टक्के वाटा मिळाला, असे पटोले म्हणाले.

‘मी कोरोना आणि सणावारांमुळे थांबलो आहोत. आम्ही कायम अॅक्शन मोडमध्ये असतो. थेट कृती आणि अंमलबजावणी करणार आहोत. कमी बोलून काम जास्त केले पाहिजे हे मलाही कळते. गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राच्या जडणघडणीत काँग्रेसचे काय योगदान आहे, हे सांगणारा एक कार्यक्रम घेऊन येत आहोत. पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदींचा समावेश असलेली एक समिती येत्या १५ दिवसांत यासाठी नेमली जाईल. या समितीत प्रादेशिक समतोल राखला जाईल असेही पटोले ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!