Share

राजू शेट्टी आणि सदाभाऊ पुन्हा एकत्र पण…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांची मैत्री आणि आंदोलनातील आक्रमकपणा हा जगजाहीर होता. शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनात या दोन शेतकरी नेत्यांनी रस्त्यावर पोलिसांच्या काठ्या खाल्ल्या. आता एकमेकांपासून दूर गेलेले हे कधीकाळचे मित्र अशाच एका आंदोलनामुळे पुन्हा एकत्र येणार आहेत.

फलटण तालुक्यात २०१३ मध्ये झालेल्या ऊस दर आंदोलनप्रकरणी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना फलटण न्यायालयाने दि.१६ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आत तर राजू शेट्टी उपस्थित राहणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे परंतु, सदाभाऊ खोत हिवाळी अधिवेशनामुळे उपस्थित राहणार की नाही याबाबत साशंकता आहे.

शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या या दोन्ही नेत्यांत फूट पडल्यानंतर कोर्ट तारखेच्या निमित्ताने ते एकत्र येण्याचा योग आला आहे. यामुळे दोघेही उपस्थित राहणार का? याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!