🕒 1 min read
बीड : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे अपघातात माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे यांचे चुलत बहीण-भाऊजी ठार झाल्याची घटना घडली आहे. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी हा अपघात झाला. ममता पल्लेवाड आणि विलास पल्लेवाड असे अपघातात ठार झालेल्या दांपत्याचे नाव आहे.
बुधवारी पुसद तालुक्यातील ममता पल्लेवाड आणि विलास पल्लेवाड हे मुलाला भेटण्यासाठी कारने पुण्याला जात होते. दरम्यान, मादळमोही येथे आल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असल्याने कार पुलाखाली पडून हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला होता. अपघातानंतर परिसरातील लोकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला. त्यानंतर त्यांना उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. ममता पल्लेवाड या माजी अर्थमंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत भगिनी आहे.
महत्वाच्या बातम्या
- शहरांची नावं बदलता बदलता भाजपच्या मुख्यमंत्र्यांने चक्क फळाचे देखील नाव बदलले
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- ग्रामपंचायत निवडणूक : शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या एनकुळमध्ये भाजपची मुसंडी
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
