🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी जगभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान आता कोरोना व्हॅक्सिन संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजमधील क्लिनिकल ट्रायल अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था मध्ये लवकरच सुरु होणार आहे.
गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी नियामक मान्यता मिळाली होती. ही व्हॅक्सिन नाकाव्दारे दिली जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही व्हॅक्सिन अधिक प्रभावी ठरणार आहे.
नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात होणार आहे. या क्लिनिकल ट्रायलसाठी एम्सकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पुढच्या एक ते दोन आठवड्यात या नेजल व्हॅक्सिनची ट्रायल सुरु होण्याची शक्यता आहे. याआधी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची ट्रायलसुद्धा एम्समध्ये झाली होती.
कोव्हॅक्सिननंतर भारत बायोटेकच्याच नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल आता एम्समध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. क्लिनिकल ट्रायल करण्याआधी एम्स रुग्णालयाच्या एका कमिटीची मंजुरी घ्यावी लागते. या प्रक्रियेनंतर ट्रायल सुरु केली जाईल. एम्सचे कम्युनिटी मेडिसिन डॉक्टर संजय राय यांनी म्हटलं की, एथिकल मंजुरी मिळाल्यानंतर ट्रायल सुरु होईल. सर्व सोपस्कर पार पडल्यानंतर ट्रायलची पुढची प्रक्रिया होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी पाहणी करून उपाययोजना करावी; शरद पवारांचे निर्देश
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
