Share

‘देशाला सध्या दूरदृष्टी असलेल्या सरकारची गरज’

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशातील या कोरोना संकटात जनतेला एकमेकांची मदत करण्याचे आणि या आंधळ्या ‘सिस्टम’ला सत्य दाखवण्याचे आवाहन केले. दूरदृष्टी असलेल्या केंद्र सरकारची देशाला गरज असल्याचेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये मोदी सरकारवर खोचक टीका केली. सामान्य लोक एकमेकांची मदत करत आहेत. एखाद्याच्या हृदयाला स्पर्श करण्यासाठी हात लावण्याची गरज नसते. मदतीचा हात देत चला, या आंधळ्या सिस्टमला आरसा दाखवत चला, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. नव्या संसद इमारतीसह केंद्रीय कार्यालयांच्या नव्या इमारतींच्या बांधणीचा समावेश असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरदेखील राहुल यांनी टीका केली. सध्या सेंट्रल व्हिस्टा हे देशाचे प्राधान्य नसून दूरदृष्टी असलेल्या केंद्र सरकारची देशाला गरज आहे, असे राहुल म्हणाले.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीच्या स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी २० तासांपर्यंत वाट बघावी लागत असल्याच्या बातमीचा दाखला देत मोदी सरकारला लक्ष्य केले. हा मानवतेविरोधात गुन्हा आहे. एकामागे एक अंत्यसंस्कार सुरूच असून पीडितांना २० तासांपर्यंत वाट बघावी लागत आहे. अहंकारी राज्यकर्त्यांच्या पाषाण हृदयाचा हा पुरावा आहे. आपल्याच लोकांच्या मृतदेहांच्या पायावर सरकार बळकट होऊ शकत नाही. ही छायाचित्रे आणि या घटना मोदी सरकारला आयुष्यभर छळतील, असा घणाघात सुरजेवाला यांनी केला. कोरोना महामारीच्या परिस्थितीवर काँग्रेस नेते दररोज मोदी सरकावर टीकेची झोड उठवत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!