सोलापूर: बार्शी विधानसभेचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचे लग्न रविवारी बार्शीत मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन मुलांचा रणजीत आणि रणवीर यांचा विवाह रविवारी मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पण यादरम्यान कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हते. यामुळे कोरोनाचे नियम धाब्यावर पडत हा विवाह पार पडला.
दरम्यान या विवाहाला चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी या विवाहाला उपस्थित होते.
दरम्यान राज्यात अजूनही कोरोना प्रतिबंधक काही नियम आहेत. या नियमातही हजारोच्या संख्येने उपस्थिती होती. त्यात कोरोनाचे कोणतेही नियम पाळले नसताना कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता कोरोना नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत असे यातून स्पष्ट होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेगॅससमधून होणारी हेरगिरी म्हणजे देशद्रोहच’; राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- ‘दहशतवाद्यांविरोधात वापरण्याचे शस्त्र भारताच्या लोकशाहीच्या विरोधात का वापरले ?’
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- धोनीचा शिलेदार पुणेकर ऋतुराज आज करु शकतो आंतरराष्ट्रीय पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
