सातार : राज्यात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर सातारा जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 200 च्या वर पोहोचली असून निम्म्याहून अधिक रुग्ण बरे होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १०० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
तसेच काल दिवसभरात साताऱ्यात 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. हाती येत असलेल्या माहितीनुसार यापैकी एकूण 9 कोरोना रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व पातळीवर यंत्रणा अहोरात्र कष्ट करत आहे.
दरम्यान, कोल्हापूर शहरातील सहा जणांसह आणखी 46 जण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 228 झाली. जिल्ह्यात गुरुवारी कोरोना बाधितांचा आकडा दोनशेपार झाला. यामुळे कोल्हापूर मध्ये देखील कोरोनाने हाहाकार मजला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
अभिमानास्पद : कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्राथमिक शिक्षक बनले कोरोना योद्धा !
आनंदाची बातमी : ससूनमध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी !
लढाई जिंकणार : कोरोना बरे झालेल्यांची विक्रमी संख्या; एकाच दिवसात १४०८ रुग्णांना घरी सोडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

