Share

कोरोनावर रामबाण औषध मिळाले; पतंजली योगपीठाच्या दाव्याने भारतीयांच्या आशा वाढल्या

Published On: 

नवी दिल्ली- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात हजारो लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. भारतासह अनेक देशातील शेकडो वैज्ञानिक आणि डॉक्टर कोरोनावर लस तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. दरम्यान, पतंजली आयुर्वेद कंपनीचे को-फाउंडर आचार्य बालकृष्ण यांनी कोरोवर औषध तयार केल्याचा दावा केला आहे.

आचार्य बालकृष्ण म्हणाले की, ‘पतंजलीच्या औषधाने शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. या औषधाचा क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा रिझल्ट देखील येणार आहे. मात्र, आतापर्यंत औषध घेतलेल्या 80 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे’, असं आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं.

आचार्य बालकृष्ण म्हणाले की, आतापर्यंत पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांच्या औषधाने बरे झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा डेटा तयार केला आहे. कोरोनामधील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि सर्व वयोगटातील लोकांचा डेटा आहे. यासह, शेकडो लोकांवर क्लिनिकल चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत.

आचार्य म्हणाले, कोरोना विषाणू भयावह स्थितीत आहे. कोरोना विषाणूचा शोध लागला तेव्हापासूनच पतंजली संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने त्याच्या औषधाचा शोध सुरू केला होता. दरम्यान, पतंजली संशोधन संस्था लवकरच जगातील प्रतिष्ठित विज्ञान जनरल मध्ये हा पेपर प्रकाशित करणार आहे. यासाठी तयारी सुरू केली आहे. वैद्यकीय विज्ञानात लोक जे काही पुरावे विचारतात त्यांना ते पुरवले जाणार आहेत.

रयत क्रांती तर्फे मोदी सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताच्या निर्णयाचे साखर वाटून स्वागत

धनंजय मुंडे यांच्या संपर्कातील काही मंत्री सेल्फ क्वारंटाईन

दिवस फिरले; राणू मंडल यांच्यावर पुन्हा आली उपाशीपोटी राहण्याची वेळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!