Share

मराठवाड्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक, मृत्यूचे प्रमाणही जास्त

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. मराठवाड्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिक आरोग्य सुविधांसाठी त्रस्त आहेत. विशेष म्हणजे पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी आरोग्य सुविधा मिळत नसल्याने तिथले रुग्णही औरंगाबादसह मराठवाड्याकडे धाव घेत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आरोग्य सेवेवरील ताण वाढला आहे.

मराठवाड्यात शुक्रवारी ५,८५९ रुग्ण आढळले तर ५५,६३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये शुक्रवारी औरंगाबादमध्ये ९८८ रुग्ण आढळले असून २६ रुग्णांचा मृत्यू झाला. तर जालनामध्ये ६८८ रुग्ण आढळले असून १० रुग्णांचा मृत्यू झाला. तर परभणी ६२० (२३), हिंगोली १३२ (६), नांदेड ५६८ (१५), लातूर ८८९ (३२), उस्मानाबाद ६६० (८),  बीड जिल्ह्यामध्ये १३१४ रुग्ण आढळले असून १९ रुग्णांचा मृत्यू झाला.

मराठवाड्यातील रुग्ण संख्या वाढत असतांना औरंगाबाद खंडपीठाने औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे तत्काळ भरण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. त्याच प्रमाणे राज्यातील इतरही जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे. ही पदे तत्काळ भरती झाल्यास आरोग्य विभागावरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच यामुळे रुग्णांनाही चांगल्या आरोग्य सुविधा मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!