Share

लस घ्या अन घरी जातांना कोरोना घेऊन जा! लसीकरणासाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे ४५ च्या पुढील नागरिकांचे लसीकरण थांबवण्यात आले होते. आता प्राप्त झालेल्या लसींमधून बुधवारपासून १८ प्लस आणि ४५ च्या पुढील नागरिक ज्यांचे दुसरे डोस बाकी आहेत अशांचे लसीकरण सुरु झाले आहे. मात्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येकास कोविन अॅपवर नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. लसींचा तुटवडा आणि एपमधील त्रुटींमुळे शहरातील अनेक केंद्रांवर लस घेणाऱ्यांची मोठी गर्दी उसळत आहे. यावर कुणाचाही अंकुश नाही. काही ठिकाणी पोलीसांना मध्यस्थी करावी लागत आहे.

शहरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु केली आहे. सुरुवातीला फ्रंटलाइन कर्मचारी वर्गाला लस देण्यात आली. त्यानंतर मात्र महापालिकेने जम्बो लसीकरण मोहीम सुरू करत ११५ वॉर्डात केंद्र सुरु केले आहे. त्यासोबत खासगी २६ व सरकारी दोन अशा केंद्रावर शहरात लसीकरण सुरू होते. दररोज सहा ते सात हजार नागरिकांना लस दिली जात असल्याने महापालिकेने प्रत्येक आठवड्यासाठी एक लाख लसींची मागणी नोंदविली होती. मात्र शासनाकडून लस पुरवण्यात कुचराई होत असल्याने ४५ च्या पुढील नागरिकांचे लसीकरण थांबले आहेत.

सध्या मनपाच्या काही मोजक्या केंद्रांवर १८ ते ४४ , तसेच ४५ च्या पुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरु आहे. मात्र या सर्वच केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. याठिकाणी योग्य नियोजन करण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नसल्याचे चित्र आहे. या गर्दीतून कोरोना संसर्ग पसरणार नाही का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतांना दिसत आहे. शहरातील खाजगी रुग्णालय, शिवाजी नगर केंद्र, सातारा जिल्हा परिषद शाळा याठिकाणी गुरुवारी (दि.६) लस घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. येथील पोलिस निरीक्षक माळाळे, रमेश बाहुले, सोमनाथ शिराळे यांच्या मध्यस्थीने गर्दीला पांगवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!