Share

‘बावनकुळेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही’, विनायक राऊतांचा टोला

Published On: 

मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

९ जून रोजी प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक या पत्रात म्हणाले आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या या पत्रामुळे पुहा एकदा भाजप-शिवसेना युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरवात झाली असून भाजप नेते देखील या चर्चांना हवा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भर म्हणजे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोटच केलाय.

‘प्रताप सरनाईकंच नाही, तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करतायत, शिवसेना कमजोर होत आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्याने शिवसेना आमदारांवर लोकांचा रोष कायम आहे. त्यामुळे शिवसेना- भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानावर शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत प्रतिक्रिया देत बावनकुळे यांचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘बावनकुळेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही. प्रताप सरनाईकांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावायचा, सीबीआयचं प्रेशर आणायचं आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने लिहून घ्यायचं. मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आणायचं हा कुटील डाव ईडीचा आहे. अशा पद्धतीचे अनेक डाव ईडीने केले आहेत. सरनाईक यांना जो काही त्रास होतोय त्याच्या मुळाशी जाणं गरजेच आहे. सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्या पद्धतीने ईडी त्रास देत आहे, तो केवळ आणि केवळ केंद्र सरकारने केलेला सत्तेचा दुरुपयोग आहे’, अशी टीका त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!