औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षावर शहरातील पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर अद्याप पर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. सरकार त्याला पाठीशी घालत आहे. तसेच शक्ती कायदा हा कदाचित मुख्य मंत्री महोदयांनाच समजला नसेल अशी खोचक प्रतिक्रिया मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नूतन जैस्वाल यांनी केली.
हे तिघाडी सरकार महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सक्षम नाही. बलात्कारी सरकार सध्या महाराष्ट्रात आहे असं म्हणायला हरकत नाही. सरकार सध्या अधिवेशनात महिला रक्षणासाठी शक्ती कायदा आणत आहे. तो कायदा येण्याआधीच सरकार मधील मंत्री, तसेच पक्षांचे मोठे पदाधिकारी यांच्यावरच महिलांचे शोषण केल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे शक्ती हा कायदा मुख्यमंत्र्याना समजलाच नसेल.
मंत्री मंडळातील मंत्र्यांपासून ते सरकार मध्ये समाविष्ट असलेल्या पक्षातील मोठ्या पदाधिकारी यांच्या वर महिलांनी थेट आरोप केले आहे. शक्ती कायदा अणन्या आधी ज्यांच्या वर आरोप झाले आहे त्यांना शासन करा. तसेच महिलांना स्वरक्षणासाठी महिलांना बंदुकीचे परवाने देण्याची मागणी नूतन जैस्वाल यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपाने धनगर समाजाला फसवले – नाना पटोले
- ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही’
- ‘उद्धव ठाकरे औरंगाबादचं संभाजीनगर करूच शकत नाहीत, ते सत्तेच्या प्रेमात आहेत’
- विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

