Share

मुख्यमंत्र्यांनी पार बाभळीची उपमा दिली; अजितदादांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली

Published On: 

बारामती : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनात रंगलेल्या राजकीय ड्रामा अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. ‘सिंधुदुर्गच्या एका नेत्याने जे काही भाषण केलं पार विचारायचं सोय नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय गप्प बसतील. त्यांनीही जशास तसे उत्तर दिले. पार बांभळीची उपमा दिली’, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची खिल्ली उडवली.

चिपी विमानतळाचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. बारामती येथे झालेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.

‘काही लोकं गालबोट लावण्याचं काम करत असतात. लोकांच्या पुढे काय काम केलं हे सांगायचं असतं. सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळाचं लोकार्पण झालं. पण तिथेही तोच प्रकार घडला. मी त्या ठिकाणी विकास कामांवरच बोललो. ते विमानतळ काय एकट्या दुकट्याने तयार करण्याचं काम नाही. यासाठी सगळ्यांनी पाठपुरावा केला आहे. 25 वर्षांपूर्वी विमानतळाचं भूमिपूजन झालं. हा आनंदाचा क्षण होता, सर्वांनी मिळून मिसळून आनंदात सहभागी होण्याचं काम होतं. एक नेते उठले आणि आणि भाषण हाणलं की विचारायची सोय नाही. ते भाषण झाल्यावर मग मुख्यमंत्री तरी कसे गप्प बसतील. त्यांनी त्याला जशास तसं उत्तर दिलं पार बाभळीची उपमा दिली, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांना चांगलाच टोला लगावला.

बारामती तालुक्यात कोणी सभेला आला आणि पवार साहेबांवर टीका केली की त्या उमेदवाराची मतं कमी होयची. ही आपल्या बारामतीतील पद्धत आहे, असं म्हणत साहेबांचा दरारा असल्याचं अजित दादांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!