Share

अजित पवार आता जास्त दिवस बाहेर राहणार नाहीत; निलेश राणेंचा दावा

Published On: 

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. हे धाडसत्र सुरू असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘अजित पवार यांनी रडणं बंद करावं. अजितदादांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीत, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

‘आहे त्या पदावर राहून माझ्यावर अन्याय होतो असं अजित पवार सांगतात. तुमच्यावर अन्याय कसला झाला? किती वर्ष मंत्रिपदावर आहात? तुमच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला किती फायदा झाला? म्हणून अजित पवार यांनी रडणं बंद करावं. अजित पवारांचे बाहेर राहण्याचे जास्त दिवस शिल्लक नाहीयेत आता’, असं राणे म्हणाले आहेत.

अजित पवारांवर धाडी पडतात याचा अर्थ त्यांनी काही तरी गडबड केली असणार. गडबडीसाठीच त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. विधायक कामांसाठी त्यांचं नाव आहे असं एखादं उदाहरण मिळणार नाही. म्हणून त्यांच्या घरावर त्यांच्या कंपन्यांवर रेड पडतेय याचा अर्थ गडबड केली असणार त्यांनी. म्हणून रेड पडत आहे. आता अजित पवार जे काही रडत आहेत. त्यांनी किती कुटुंब उद्ध्वस्त केली. किती लोकांना धंद्याला लावलं हे विसरले. ही नियती आहे. इथेच भोगावं लागतं. अजित पवार साहेब इथंच भोगणार तुम्ही. हे आता लांबपर्यंत जाणार. अजित पवार आता यातून सुटू शकणार नाही. हे त्यांनाही कळून चुकलं आहे, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!