मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित दुकानेही बंद ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.
परंतु कडक निर्बंध लागू करून देखील कोरोनाची साखळी काही तुटत नसल्याची परीस्थिती सध्या दिसत आहे. राज्यात आज 67123 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 56783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 3061174 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 647933 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18% झाले आहे.
राज्यातील हॉस्पिटल्स रुग्णांमुळे तुडुंब भरलेली आहे. रुग्णांना लवकर बेड उपलब्ध होत नाहीये तर दुसरीकडे रेमेडीसीवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत आहे. अशा परिस्थितीत रोज वाढणारे हे आकडे सर्वांच्याच चिंतेत भर पाडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पत्र गुजरात सरकारचे, लिहिले गुजरात मधल्या कंपनीला आणि दोष केंद्राचा ; महाजनांचा टोला
- आ.प्रशांत बंब यांच्या प्रयत्नांना अखेर यश, गंगापूर उपजिल्हा रुग्णालयास मिळाली नवीन रुग्णवाहिका!
- परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, संपूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी मी आग्रही – भुजबळ
- एक देश एक रेशन कार्ड सुविधा औरंगाबाद जिल्ह्यात उपलब्ध, नागरिकांनी लाभ घ्यावा
- ‘मलिकने जशी स्वतःची अक्कल दाखवली तसचं महाराष्ट्र FDAचा पण पेपर दाखवावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

