नाशिक : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र कडक निर्बंध लावून देखील कोरोनाची साखळी तुटत नसल्याने आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. ऑक्सीजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये तर ही परिस्थिती जास्तच चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
संपूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी मी आग्रही असून तशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा या संबंधी भेटणार असल्याचे छगन भूजबळ यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नाशिकमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘मलिकने जशी स्वतःची अक्कल दाखवली तसचं महाराष्ट्र FDAचा पण पेपर दाखवावा’
- टेस्लाने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं अन्यथा… : नितीन गडकरी
- ऑक्सिजनचा पुरवठा नियमित उपलब्ध व्हावा, मुख्यमंत्र्यांकडे आ. दानवेंची मागणी
- १९ एप्रिलपासून व्यापारी, बँक कर्मचारी, कामगारांना मिळणार लस!
- दिलासा! केंद्राच्या हस्तक्षेपामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत घट


