औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील आजूबाजूच्या बहुतांश गावातील कोविड रुग्णांचा भार असलेल्या गंगापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिकाच वेळेवर उपलब्ध होत नव्हती. एक रुग्णवाहिका काही दिवसांपूर्वी जळाल्यामुळे कोरोना रुग्णांसाठी, अपघातात जखमी झालेल्या गंभीर रुग्णांबरोबरच गरोदर मातांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागत होता. आ. प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यामुळे गंगापूर तालुक्यास नवीकोरी रुग्णवाहिका मिळाली आहे. मात्र हि रुग्णवाहिका मिळवून देण्यात आमदारांना जरा उशीरच झाला अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
गंगापूर तालुक्यातील आसपास असलेल्या सर्वच खेड्यांना रुग्णवाहिका मिळवण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खासगी रुग्णवाहिकेची तासनतास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयाला एक नवीन रुग्णवाहिका मिळावी यासाठी गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पाठपुरावठा करून आमदार अतुल सावे यांच्या निधीतून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाकरीता रुग्णवाहिका मिळवली.
मात्र गंगापूर सारख्या तालुक्यात ज्याठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे. अशा रुग्णालयात एकही रुग्णवाहिका नसणे हि दुर्दैवी गोष्ट आहे. तसेच कोरोनाच्या काळातच प्रशासनाला जाग आली का? असा सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केला. आरोग्य सुविधा देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारचा पुढाकार घ्यायलाच हवा. आता रुग्णवाहिका मिळाल्यामुळे रुग्णांची पायपीट मात्र थांबणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, संपूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी मी आग्रही – भुजबळ
- एक देश एक रेशन कार्ड सुविधा औरंगाबाद जिल्ह्यात उपलब्ध, नागरिकांनी लाभ घ्यावा
- ‘मलिकने जशी स्वतःची अक्कल दाखवली तसचं महाराष्ट्र FDAचा पण पेपर दाखवावा’
- टेस्लाने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं अन्यथा… : नितीन गडकरी
- ऑक्सिजनचा पुरवठा नियमित उपलब्ध व्हावा, मुख्यमंत्र्यांकडे आ. दानवेंची मागणी


