मुंबई : देशात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गरज आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी भटकत असून त्याचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज सकाळी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला.
मलिक यांच्या आरोपामुळे आज दुपार एकच खळबळ उडाली असून त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र आपल्याला आज दुपार पासून पाहायला मिळत होते. ‘नवाब मलिक यांनी याव्बत पुरावा द्यावा अन्यथा त्यांनी जनतेची माफी मागून राजीनामा द्यावा.’ अशी मागणी भाजपने जोर लावून धरलेली होती.
यातच आता नवाब मलिक यांनी ट्वीट करून एक भाजपसाठी ‘लेटरबॉम्ब’ प्रसिद्ध केले आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्र शेअर केलं आहे. ‘केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक मिळत असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. केवळ गुजरात राज्यालाच रेमडिसीव्हीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या निर्यात कंपनीला मंजुरी देण्यात आल्याचं हे पत्र असल्याचं मलिक यांनी म्हटले आहे. तसेच, या दुटप्पीपणाचं स्पष्टीकरण देता येईल का? असा सवालही मलिक यांनी विचारला आहे. दरम्यान, या पत्रावर गुजरातच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांची सही आहे.
पत्र गुजरात सरकारचे. लिहिले गुजरात मधल्या कंपनीला. दोष केंद्राचा…
आम्ही करणार काहीच नाही. फक्त दोष देणार केंद्र सरकारला…
अजब तुझे सरकार! https://t.co/IJwFTxZy3K
— Poonam Pramod Mahajan (@poonam_mahajan) April 17, 2021
नवाब मलिक यांनी प्रसिद्ध केलेल्या या पत्रावर आता भाजप नेत्यांनी टीकास्त्र डागलेले आहे. या वादामध्ये आता भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी उडी घेतली आहे. त्यांनी एक ट्वीट करून महाविकास आघाडीवर निशाना साधलेला आहे.’पत्र गुजरात सरकारचे. लिहिले गुजरात मधल्या कंपनीला. दोष केंद्राचा…आम्ही करणार काहीच नाही. फक्त दोष देणार केंद्र सरकारला…अजब तुझे सरकार!’ अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सरकारवर टीकास्त्र डागलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मलिकने जशी स्वतःची अक्कल दाखवली तसचं महाराष्ट्र FDAचा पण पेपर दाखवावा’
- एक देश एक रेशन कार्ड सुविधा औरंगाबाद जिल्ह्यात उपलब्ध, नागरिकांनी लाभ घ्यावा
- ‘मलिकने जशी स्वतःची अक्कल दाखवली तसचं महाराष्ट्र FDAचा पण पेपर दाखवावा’
- टेस्लाने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं अन्यथा… : नितीन गडकरी
- ऑक्सिजनचा पुरवठा नियमित उपलब्ध व्हावा, मुख्यमंत्र्यांकडे आ. दानवेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

