उस्मानाबाद : महाराष्ट्र झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पिकं डोळ्यासमोर वाहून गेल. अशात बळीराजाला मदत तर सोडाच पण साधी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारला वेळ मिळाला नव्हता. मात्र आता तब्बल दोन महिन्यानंतर केंद्र सरकार वरातीमागून घोडे नाचवत आहे. अखेर दोन महिन्यानंतर केंद्राच्या पथकाला जाग आली आहे. अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी पथक मराठवाड्यात पोहोचणार आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील काही भागात धुडगूस घातला होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जमीन दोस्त झाली होती. शेतकऱ्यांना मदत देण्यावरून सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली होती. राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर अखेर महिन्याभरानंतर केंद्राचे पथक बांधावर पोहोचणार आहे.
येत्या 20 आणि 21 डिसेंबर रोजी केंद्रीय पथक मराठवाड्यात दाखल होणार आहे. उस्मानाबाद, बीड भागातील पाहणी करणार आहे. केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीप हंगामाचे परीक्षण करणार आहे. परीक्षण केल्यानंतर हे पथक आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करेल. त्यानंतर केंद्राकडून मदत दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी ऊसतोड कामगाराचा मुलगा; ऊसतोड कामगारांना विशेष सहाय्य मिळवून देणार’
- नागपूरमध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपच्या एका गटाला खूप उकळ्या फुटतायत- अजित पवार
- बांग्लादेश निर्मिती केलेल्या ‘आयर्न लेडीच्या’ पाकिस्तानवरील विजयाला ५० वर्ष पूर्ण !
- आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘गोड बातमी’ मिळण्याची शक्यता
- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भाजपची प्रामाणिक इच्छा असेल तर ‘हे’ करायला हवे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

