मुंबई:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही काँग्रेसचा उमेदवार विजयी ठरलाय.
पुण्याला चंद्रकात पाटील प्रतिनिधीत्व करत होते. पण, आमचा उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आला. औरंगाबादला सतिश चव्हाण तिथे प्रचंड मतांनी निवडून आले. अमरावतीला चुकलं, पण, एक समाधान आहे तिथं भाजपचा उमेदवार निवडून आला नाही. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे संदीप जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला. नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटतायत, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.
अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणचा प्रश्न, ओबीसींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल, कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या काळात कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारने स्वयंपाक गॅसची किंमत वाढवून सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे पाप केले : राष्ट्रवादी
- बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- निलेश लंके
- ‘हा’ मातब्बर नेता करणार अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
- हिवाळी अधिवेशनात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर !
- ‘रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार राज्यासह देशाचा गौरव’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

