🕒 1 min read
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन संदर्भात मोठे विधान केले आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्राने सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीचा निर्णय घेतला आहे. तर बाकी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. त्यामुळे राज्यातही लॉकडाऊन लागणार का, याबाबत कोरोना परिस्थितीसंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी म्हटले आहे.
दरम्यान पुणे शहरातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुण्यात कडक निर्बंध लागणार का याबाबत आज अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. आज साडे चार वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.
दरम्यान केंद्राने यासंबंधी निर्णय घेतला आहे. आता राज्य लॉकडाऊनबाबत कॅबिनेट मध्ये चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान आज राज्यात तब्बल १२ हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ६६ ओमायक्रोनचे नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील शाळाही ३१ जानेवारी पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. तर हरियाना आणि झारखंड राज्याने मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्र्राबाबत चर्चा करून निर्णय होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थावर’ कोरोनाचा शिरकाव
- “कोहलीला सचिन तेंडुलकरच्या मार्गाने जाण्याची गरज नाही, कारण…”; माजी क्रिकेटपटूचे विधान
- औरंगाबादेत पालकमंत्र्यांच्या हस्ते १०३ शिक्षकांचा गौरव; आ. दानवेंचा विशेष पुढाकार..!
- ‘ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणाऱ्या प्रस्थापितांच्या सरकारचं ओबीसी प्रेम फसवं’
- राहुल गांधी ‘अॅक्सिडेंटल हिंदू’; योगी आदित्यनाथ यांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
