Share

केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजेत; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

Published On: 

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडून केंद्राकडे जीएसटी परतावा देण्याची मागणी होत होती, अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्रही लिहिलं होतं, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. आता याला यश मिळाल्याचे आहे. केंद्र सरकारने मार्च २०२० साठी राज्यांचा जीएसटी परतावा दिला आहे. त्यात सर्वाधित जीएसटी परतावा रक्कम महाराष्ट्राला मिळाली आहे.

तर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘राज्य सरकारने केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजेत’, असे वक्तव्य याबाबत केले आहे. फडणवीस म्हणाले,”जीएसटी बाबत महाराष्ट्रावर अन्याय होतोय असे जे सांगत होते होते. परंतु कालच देशाच्या निर्मला सितारामण जी यांनी जीएसटीच्या वस्तुस्थिती जाहीर केली आहे आणि देशामध्ये सर्वात जास्त जीएसटीचा परतावा १९ हजार २०० कोटी रुपये महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे.”

अन पवारांमुळे धोनी कर्णधार झाला…जितेंद्र आव्हाडांनी सांगितला किस्सा

सोबतच ते म्हणाले, “केंद्राने अशा आर्थिक अडचणीमध्ये जीएसटी सेस कडे फंड नसताना स्वतःच्या कोट्यातून या जीएसटी सेसला ७५ हजार कोटी रुपये दिले, ज्यातून महाराष्ट्राला संपूर्ण परताव्याचा शेअर केंद्र सरकारने दिला त्यामुळे मी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो. तसेच महाराष्ट्रातील तमाम मंत्र्यांना देखील विनंती करतो, जे आतापर्यंत आरोप लावले त्यांनी देखील आभार मानले पाहिजे.”

धुसफूस सुरूच : सरकार महाविकास आघाडीचे आहे की राष्ट्रवादीचे? शिवसेनेच्या नेत्याचा थेट सवाल

दरम्यान, यावेळी त्यांनी पीएम केअरवर टीका करणाऱ्यां देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, ‘ यासंदर्भात RTI कार्यकर्ते अनिल गलगले यांनी RTI मधून माहिती घेतली असून पीएम केअर मधून सर्वाधिक मदत मी महाराष्ट्राला केली गेली असल्याचे समोर आले आहे.म्हणून काहीही झालं कि उठायचं आणि केंद्र सरकारच्या विरोधात बोलायचं हे आता राज्य सरकारच्या मंत्रींनी बंद केलं पाहिजे असं देखील ते म्हणाले.

बॉलिवूडला आणखी धक्का; जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!