Share

धुसफूस सुरूच : सरकार महाविकास आघाडीचे आहे की राष्ट्रवादीचे? शिवसेनेच्या नेत्याचा थेट सवाल

Published On: 

सोलापूर- सोलापूरातील कोरोना परिस्थिती माहितीसाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्षांनी चुकीचे नियोजन केल्याने भेट घेता आली नसल्याची खंत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांनी व्यक्त केली.

माझ्या ४५ वर्षाच्या राजकीय प्रवासातील हा पहिलाच प्रसंग आहे. पवार साहेब सोलापुरात आले मात्र, प्रत्यक्षात भेटता आले नाही त्या बद्दल खंत व्यक्त केली. तसेच मी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना शनिवारी कमीतकमी २५ वेळा फोन केला, मात्र त्यांनी उचललाच नाही असं त्यावेळी सपाटे म्हणाले होते.

त्यानंतर या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भरणे यांनी केला मात्र आता आता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सोमेश्वर क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली आहे. दैनिक सकाळने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

सोमेश क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त करताना म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आम्हाला विश्वासात घेत नसून आम्हाला सापत्न वागणूक देत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कायम दुय्यम वागणूक देत असून विकासकामांना प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे हे सरकार महाविकास आघाडीचे आहे की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे, असा प्रश्न आम्हाला पडत आहे.

महत्वाच्या बातम्या-

पवार बकरी ईदसाठी पुढे पुढे नाचतायत, तर मुख्यमंत्री…भाजपा आमदाराने केली खोचक टीका

“…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल”; राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला पत्रातून दिला इशारा

अरे देवा…. नागपूरकरांवर लटकतेय ‘इतक्या’ दिवसांच्या लॉकडाऊनची टांगती तलवार ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!