Share

अन पवारांमुळे धोनी कर्णधार झाला…जितेंद्र आव्हाडांनी सांगितला किस्सा

Published On: 

मुंबई: साहेब माझा विठ्ठल या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील लेखाच्या २७ व्या भागात जितेंद्र आव्हाड यांनी एक रंजक किस्सा सांगितला आहे. यात त्यांनी सगळयात जास्त प्रसिद्ध व विजयी कर्णधार म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या कप्तान पदी निवड करण्यामागच्या घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.

राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट-

साहेब_माझाविठ्ठलभाग – 27

महेंद्रसिंग धोनीच्या निवडीचा रंजक किस्सा..!

2008 चा तो काळ होता.BCCI चे अध्यक्ष होते पवार साहेब. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर होता.त्यावेळी संघाचा कर्णधार होता आपल्या सर्वांचा आवडता खेळाडु राहुल द्रविड.पवार साहेब देखील Bcci अध्यक्ष या नात्याने आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर होते.
दौरा सुरू असताना एक दिवस अचानक राहुल द्रविड पवार साहेबांना भेटायला आला.साहेब ब्रेकफास्ट करत बसले होते.साहेबांनी द्रविडच स्वागत केलं आणि अचानक येण्याचं प्रयोजन विचारलं.

कोणी चंपा, टरबुज्या म्हणलं तर खपवून घेऊ नका, पलटवार करा: चंद्रकांत पाटील

द्रविड साहेबांना,”मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा..!” असे म्हणाला. चालु दौऱ्यात द्रविड सारखा खेळाडू अशी मागणी करतोय हे पाहून साहेबांना नाही म्हटलं तरी थोडा धक्का बसला.यावर साहेबांनी द्रविड ला विचारले की,”इंग्लंड दौरा सुरू असताना,आणि या दौऱ्यावर तू कॅप्टन असताना असा तडकाफडकी निर्णय कसा घेता येईल..? दुसरं म्हणजे हे निर्णय मी घेत नाही.यासाठी तू निवडसमितीकडे जायला हवं..कारण हा निर्णय पूर्णतः निवड समितीचा असतो…!”

ऐश्वर्या-आराध्या कोरोनामुक्त; आनंदाश्रू आवरत बिग बी म्हणाले…

तरीदेखील द्रविडने साहेबांकडे,”मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळीक द्या,माझ्या व्यक्तिगत कामगिरीवर या जबाबदारीमुळे परिणाम होतो” हा धोशा कायम ठेवला.तो ऐकत नाही म्हटल्यावर साहेबांनी द्रविडला पर्यायी कर्णधाराच नाव सुचवायला सांगितले.द्रविडणे यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच नाव साहेबांना सुचवलं. साहेबांनी मग सचिनला कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल विचारलं.सचिनने देखील कामगिरीच कारण देत कर्णधारपद स्वीकारण्यास प्रांजळपणे नकार दिला.

राज्यातील भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप

दौरा सुरू होता आणि या दौऱ्यात संघाचे दोन्ही दिग्गज खेळाडू कर्णधारपदासाठी तयार नव्हते.शेवटचा उपाय म्हणून साहेबांनी मग त्या दोघांनाच योग्य व्यक्तीच नाव सुचवायला सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे दोघांनी मिळून एकच नाव घेतले.ते नाव होत महेंद्रसिंग धोनी.

साहेबांनी यावर विचार केला.सचिन आणि द्रविड सारखे खेळाडू धोनी च नाव घेतायत म्हटल्यावर साहेबांनी मोठ्या विश्वासाने हे नाव निवडसमितीला सुचवलं.दिलीप वेंगसरकर त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते.धोनीच्या नावावर सचिन ,राहुल आणि खुद्द Bcci अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती.निवड समितीने धोनीला कर्णधार बनवत असल्याचा निर्णय जाहीर केला..!

पुढे याच महेंद्रसिंग धोनीने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात इतिहास घडवला.

#साहेब_माझाविठ्ठल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!