Share

‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेपासून वाचण्यासाठी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांशी संवाद साधत असतांना परमबीर सिंग कुठे आहेत हे राज्य सरकारला माहिती आहे का? असे विचारण्यात आले असता अजित पवार म्हणाले की,’ माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारला याविषयी माहिती नाही’ असे उत्तर त्यांनी दिले.

दरम्यान, सचिन वाझेच्या अटकेनंतर एप्रिल महिन्यात एनआयएने सर्वात प्रथम परमबीर यांचा वाझेवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईसंबंधी माहिती घेण्यासाठी जबाब नोंदवला होता. प्रकरण समोर आले तेव्हा वाझे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. एनआयएच्या सूत्रांनुसार, ऑगस्टमध्ये परमबीर सिंग यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, त्यांनी उत्तर दिले नाही. अधिकारी हरियाणात चंदीगड आणि रोहतकमधील त्यांच्या निवासस्थानीदेखील गेले होते, पण ते सापडले नाहीत. खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यावर चौकशीला प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांकडूनही लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. परंतु परमबीर सिंग नक्की आहेत कुठे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!