औरंगाबाद : औरंगाबादहून जालन्याला जाणाऱ्या धावत्या ट्रॅव्हल्सला शनिवारी मध्यरात्री १२ वाजता अचानक आग लागली. बसमध्ये चालक व वाहक वगळता कोणताही प्रवाशी नव्हता. आग लागल्याचे समजताच चालक आणि क्लिनर यांनी प्रसंगावधान राखून बस थांबवत त्यातून उडी मारली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण आग लागल्याने बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना जालना–औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर तालुक्यातील वरुडी पाटी जवळील गजानन महाराज मंदिराजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनूसार, औरंगाबाद येथून जालन्याला प्रवाशी घेऊन जाणारी रिकामी साईरथ ट्रॅव्हल्सची बस (क्र. एमएच 24 –9954)वरुडी शिवारातील गजानन महाराज मंदिराजवळ पोहोचताच बसला अचानक आग लागली. बसला आग लागल्याचे चालक संजय क्षीरसागर समजताच त्यांनी मोठ्या शिताफीने बस रस्त्याच्या कडेला थांबवत क्लिनर गणेश विठ्ठल मचे यांच्यासह बसमधून उडी घेतली. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाय बसला लागलेली आग विझविण्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून पाण्याचे टँकर मागविले. तसेच जालन्याहून अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीच्या घटनेत पेटलेल्या ट्रॅव्हल्सच्या बसचे प्रचंड नुकसान झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- यत्र तत्र सर्वत्र तेच, मग विरोधाची नौटंकी कशाला? सीईओ पदावरून अतुल सावेंचा खैरेंना टोला
- पुन्हा लॉकडाऊन? कोरोना फैलावत असल्याने उद्योग क्षेत्र चिंतातूर
- पैठण तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पंधरा दिवसांसाठी बंद
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना

