Share

शेतकऱ्यांची कृषी उत्पादने विक्रीसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आणला इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म

Published On: 

मुंबई : पंजाब, हरियाणा, आणि उत्तर प्रदेश मधील हजारो शेतकरी दिल्लीतीन तीन आंतरराज्यीय सीमांवर आंदोलन करीत आहेत. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज १८ वा दिवस आहे. शेतकरी प्रतिनिधीमंडळ आणि केंद्रीय नेते यांच्यात आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्यात. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

एकीकडे आद्य[प हे आंदोलन निर्णायक टप्प्यापर्यंत देखील पोहचले नाहीय शेतकऱ्यांना कृषी कायदे पटवून देण्याचा हरएक प्रयत्न सरकारकडून केला जातोय. अनेक स्तरांवर शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. परंतु, कृषी कायदे मागे घ्यावेत, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म लॉंच केला आहे. बीईएएम शेतकरी, व्यापारी आणि इतर संबंधित घटकांना शेतमाल खरेदी विक्रीतील इतर अडचणींपासून मुक्त करेल.

एक्सचेंजच्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म मध्यस्थासारखं काम करेल. कमी खर्च, उच्च खरेदी क्षमता यासह उत्पादकांना योग्य लाभ आणि एकाहून अधिक ग्राहकांमध्ये उत्पादनाचे दर निश्चित करेल. बीईएएम ही व्यवस्था उत्पादनांची खरेदी आणि व्यापार यात येणाऱ्या अडचणींना देखील दूर करेल, अशी माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनं दिली आहे.

बीईएएम या प्लॅटफॉर्मची सुरुवात 11 डिसेंबरपासून झाली आहे. सध्या हा प्लॅटफॉर्म प्रायोगिक स्वरुपात चालवला जात आहे. बीएसईने दिलेल्या माहितीनुसार हा प्लॅटफॉर्म राष्ट्रीय स्तरावर काम करेल. या प्लॅटफॉर्मची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक देश एक मार्केट या संकल्पनेनुसार करण्यात आली आहे.

या प्लॅटफॉर्मचे नाव बीएसई- ई अग्रीकल्चर मार्केट्स लिमिटेड (बीईएएम ) हे आहे. शेती उत्पादनांच्या विक्रीसाठी बीईएएम राष्ट्रीय स्तरावर इलेक्ट्रॉनिक स्पॉट प्लॅटफॉर्मच्या रुपात काम करेल. या ठिकाणी शेतकरी त्यांची उत्पादनं इलेक्रट्रॉनिक माध्यमांद्वारे ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी ठेवतील. इथं शेतकऱ्यांच्या मालाची ऑनलाईन पद्धतीनं विक्री केली जाईल, यामुळं विक्रीसाठी बोली लागलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे

बीएसई चे एमडी आशीष कुमार चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसई राष्ट्रीय स्तरावर वस्तूंच्या वितरणासाठी नेटवर्क तयार करत आहे. या नेटवर्कद्वारे वस्तूंची खरेदी पारदर्शक पद्धतीनं केली जाणार आहे. या नव्या व्यवस्थेद्वारे खरेदी केलेल्या मालाची रक्कम थेट विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!