🕒 1 min read
पुणे – हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन हा कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरूपात शांततेने, संयमाने साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मौजे पेरणे (कोरेगाव भिमा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची नियोजन आढावा बैठक काल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मौजे पेरणे (कोरेगाव भिमा) येथील विजयस्तंभाजवळ घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विवेक पाटील, उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, लैला शेख तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, आपल्या राज्यासह देश आणि जग कोरोना विरुद्ध लढत आहे. कोरोना विषाणूवर अद्यापपर्यंत लस आलेली नाही. तसेच कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी कार्यक्रमास गर्दी करु नये. अशा परिस्थितीत योग्य पध्दतीने अभिवादन कार्यक्रम साजरा करत असतांना आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. हा कार्यक्रम शांततेने आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले. बैठकीपूर्वी विजयस्तंभास जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी अभिवादन केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा करीत असतांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे.कोरोनासंकट लक्षात घेऊन यावर्षी सर्व सण-समारंभ साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. पेरणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेत कार्यक्रम साजरा करुया, असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ देशमुख यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- घरी बसून केलेल्या कामांचा शुभारंभ होतोय; ठाकरेंचा विरोधकांना सणसणीत टोला
- मी प्रश्न सोडवणारच सांगून मुंबईला निघून जायचं ही उद्धव ठाकरेंची जुनी पद्धत – राणे
- ‘पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि…’
- कौतुक तर होणारच: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीने दिसून आला त्यांचा साधेपणा
- डिसेंबरमध्येच लसीला परवानगी मिळेल, तर…; आदर पुनावालांनी केला मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
