Share

भाजपचा ‘सेलिब्रेटी पॅटर्न’ यशस्वी, दिल्लीत गंभीर तर गुरदासपुरमध्ये सनी खंबीर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. जनतेने पुन्हा एकदा भाजप सरकारला निवडले असून देशाच्या प्रतिनिधित्वाची धुरा नरेंद्र मोदी यांच्या हातात दिली आहे. देशभरातून भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे सगळीकडे वातावरण हे मोदीमय झाले आहे. त्यामूळे देशात यावेळी मोदी लाट नसून त्सुनामी होती अस म्हणव लागेल. या त्सुनामीत अनेक नवनेत्यांनी आणि सेलिब्रेटी उमेदवारांनी आपला हात धुवून घेतला आहे. दिल्लीमध्ये क्रिकेटर गौतम गंभीर आणि पंजाबमध्ये सनी देओल यांनी देखील भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून लोकसभेमध्ये आपलं स्थान निश्चित केल आहे.

निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही सेलेब्रिटींनी भाजपचा झेंडा हाती घेत राजकारणात प्रवेश केला. विशेष म्हणजे राजकारणात प्रवेशकरताच या सेलेब्रिटींना भाजपकडून उमेदवारी देखील देण्यात आली. गौतम गंभीरला भाजपने पूर्व दिल्लीतून उमेदवारी दिली तर सनी देओल यांना गुरुदासपुरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. या उमेदवारांनी अपेक्षेप्रमाणे भाजपला यश देखील मिळवून दिले.

पूर्व दिल्लीतून गौतम गंभीर ने तब्बल 6 लाख 96 हजार 156 मतं मिळवत काँग्रेसच्या अरविंद सिंह लवली आणि आपच्या अतिशी मार्लेना पराभूत केले. तर गुरुदासपुरमध्ये अभिनेता सनी देओल याने कॉंग्रेसचे विद्यमान खासदार सुनील जाखड यांना पराभूत करत भाजपला यश मिळवून दिले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या इतर फॅक्टरप्रमाणे सेलेब्रीटी फॅक्टर देखील यशस्वी झाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!