🕒 1 min read
नवी दिल्ली: वेगवेगळ्या मुद्यांवर रोखठोक भूमिका घेणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपले परखड मत व्यक्त केले आहे. यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
त्यांनी शनिवारी ट्विट करुन वृत्तसंस्था, न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय व्यवस्था यासंदर्भात भाष्य केले आहे. वृत्तसंस्था, न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय व्यवस्था हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. मात्र मोदी सरकारच्या काळात या व्यवस्थांना तडजोड करावी लागत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी सध्याच्या घडीला प्रसारमाध्यमं आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीत जगात भारताचा बराच खालचा क्रमांक लागतो.
Fact and Reality check: But much of this is inherited from 10 years usurped rule of TDK. But we have done little to rectify it pic.twitter.com/1DCRB4vHbg
— Subramanian Swamy (@Swamy39) April 10, 2021
देशातील आर्थिक विषमता आणि बेरोजगारीनेही उच्चांक गाठला तसेच पैशाचे मूल्य सातत्याने घसरत आहे. पेट्रोल डिझेलवरीलकर वाढत आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर भारत दुबळा पडत आहे. मोदी सरकारने या सगळ्याबाबत तडजोड केली आहे. यापैकी अनेक गोष्टी काँग्रेसच्या राजवटीचा परिपाक असला तरी ही परिस्थिती बदल ण्यासाठी फार कमी प्रयत्न होत असल्याची टिप्पणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाहणीसाठी आलेल्या पथकाने मनपा अधिकाऱ्यांना दिला ‘चकवा’!
- कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत – अजित पवार
- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी कोर्टाकडून अर्णब गोस्वामीला दिलासा
- केंद्रीय पथकाकडून औरंगाबाद मनपाची खरडपट्टी
- ‘आज जर राजेशाही असती तर पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवल असतं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

