Share

शेतकऱ्यांसाठी आघाडीमधील मराठवाड्याचे मंत्री चकार शब्दही उच्चारत नाही, भाजपचा आरोप

Published On: 

औरंगाबाद : ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने मराठवाड्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी औरंगाबाद भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी केली आहे.

सत्तेवर येण्यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी भरपाई देण्याची मागणी केली होती. आता ठाकरे यांनी आपण केलेली मागणी पूर्ण करावी आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही विजय औताडे यांनी केली आहे.

मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता हेक्टरी ५० हजार रु. मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही आघाडी सरकारमधील मराठवाड्याचे मंत्री चकार शब्द उच्चारत नाहीत याबद्दल, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!