Share

MSEB कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावण्याच्या वक्त्याव्यावर तुपकर ठाम 

Published On: 

बुलढाणा – वीज वितरण कंपनीचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी वीज कनेक्शन खंडित करण्यासाठी आल्यास त्याला सुरुवातीला समजून सांगा आणि ऐकत नसेल तर त्याचे कपडे काढून त्याच्या कानशिलात मारा असे चिथावणीखोर वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी वाशीम जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केले होते. या वक्तव्यामुळे सध्या बराच मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

तूपकर यांच्या या वक्तव्याचा वीज वितरण कंपनी कर्मचारी संघटनेने निषेध करत नाशिक येथील पोलीस ठाण्यात तुपकर विरोधात तक्रार दाखल केली असून कारवाई ची मागणी केली आहे. रविकांत तुपकर यांनी वाशीम जिल्ह्यात शेतकरी मेळाव्यात केलेल्या या वक्तव्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळेच नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र राज्य विज वर्कस फेड्रेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तुपकरांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

दरम्यान, मी काही चुकीचे बोललेलो नसून मी अशा तक्रारींना किंवा कारवाई ला घाबरत नाही, मी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडेच आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!