Share

#corona : कोरोनात राज्य सरकार निष्क्रिय, राज्यपालांची भेट घेऊन फडणविसांनी घेतला समाचार

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना वाढत असताना कोणत्याच उपाययोजना करत नसून परिस्थितीला हाताळण्यात राज्य सरकार निष्क्रिय ठरले आहे, असा आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केला आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी ठाकरे सरकार कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.

राज्य सरकारला जाग येण्यासाठी भाजप पक्षाने पुकारले ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची चौथ्या टप्प्यातील अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्यावर पोहोचला आहे. तरी देखील राज्य सरकार कोणतीच उपाययोजना करत नसून केवळ भावनिक साद घालत सर्व ठीक असल्याचं आभासी चित्र उभं करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

#लढा_कोरोनाचा : बाबा आमटेंची नात उतरली कोरोनाच्या युद्धात

फडणवीस म्हणाले की,  देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, कोरोनाचा सामना राज्य सरकारकडून योग्यरित्या होत नाही. अनेकांना उपचार मिळत नाहीत, एकीकडे ही अवस्था दुसरीकडे शेतमाल पडून आहे, त्याची व्यवस्था राज्य सरकारने केली नाही, बियाणं मिळत नाहीत, खतं मिळत नाही, शेतकऱ्यावर संकट आलं आहे. बारा बलुतेदारांवरही संकट, केंद्र आणि विविध राज्यांनी पॅकेज दिलं आहे, मात्र महाराष्ट्राने दिलं नाही, ते द्यायला हवं.

#corona : सोशल डीस्टंन्सिंगचे नियम पाळून उच्च न्यायालयातील कामकाजास सुरवात करावी !

तसेच शरद पवार पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात, त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लिहावं.  राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरु आहे.  सामान्य माणसाला रेशन मिळत नाही, घोटाळे सुरु आहेत, केंद्राने राज्याला पैसे देऊन ज्यांच्याकडे रेशन नाही, त्यांनाही देण्याच्या सूचना आहेत, पण ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांनाच मिळत नाही, रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही. रुग्णांना अॅम्बुलन्स मिळत नाही, त्याअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत, एक डॅशबोर्ड बनवून, रुग्णालयातील जागा सांगू शकतो, त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबेल, आता हे उघड्या डोळ्याने पाहणे शक्य नाही, असे फडणवीस म्हणाले.

आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहे, आमची मदत नको असेल तर त्यांनी उपाययोजना कराव्या. राज्य सरकारला जी मदत हवी असेल ती करु, त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही पाठिशी उभं राहू, मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिली बैठकच दोन महिन्यांनी घेतली, आम्ही तर सहकार्य करायला तयारच आहे, त्यामध्ये केवळ औपचारिकता नको, असेही फडणवीस म्हणाले.

काहीही झालं तरी शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही ! CM ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

पायी जाणाऱ्या मजुरांना थांबवा या सूचना केल्या होत्या, मात्र जातात तर जाऊद्या  आपलं संकट टळतंय अशी धारणा होती, मात्र या मजुरांना ट्रेन किंवा बसने पाठवलं जाऊ शकलं असतं.

#Lockdown_4.0 : असा असणार पुणे जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण भागात लॉकडाऊन

परदेशात अडकलेल्यांना भारतात परतायचं आहे, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे विमानं उतरण्यास परवानगी नाही, लोक व्हिडीओ करुन पाठवत आहेत, त्यांचे हाल होत आहेत.विमाने उतरण्यास महाराष्ट्राने परवानगी द्यावी, त्यांना क्वारंटाईन करुन उपचार करता येतील, मात्र त्यासाठी निर्णयाची गरज आहे, निर्णय होत नाहीत.

सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे, राज्य सरकारने पॅकेज दिलं पाहिजे, बारा बलुतेदारांचा विचार सरकारने करायलाच हवा, अन्य राज्याने केला मग आमचं सरकार कधी करणार हा प्रश्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

#corona : मुख्यमंत्र्यांनी दिले कॉस्ट कटिंगचे आदेश, एकाही मंत्र्यानी नवीन गाडी घ्येयची नाही

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!