पुणे : कोरोनाचा राज्यात चांगलाच संसर्ग झाला आहे. आतापर्यंत 35 हजार 058 जणांना कोरोना झाला आहे. तर त्यापैकी 8 हजार 437 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. तर या कोरोनामुळे आता पर्यंत राज्यातील 1 हजार 249 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी सर्व परिस्थिती असताना राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन 4 ची घोषणा केली आहे. तर मुंबई – पुण्यासारख्या शहरात यासाठी काही वेगळे नियम लागू केले आहेत.
#corona : मुख्यमंत्र्यांनी दिले कॉस्ट कटिंगचे आदेश, एकाही मंत्र्यानी नवीन गाडी घ्येयची नाही
पुणे हे कोरोना संसर्गाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे पुण्यात देखील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन 4मध्ये कडक नियम करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पुणे मार्केट यार्ड पूर्णत: बंद राहणार आहे. तसंच भुसार मार्केटही आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दुकानदारांना कोरोनाची बाधा झाल्याने भुसार व्यापारी धास्तावले आहे. त्यामुळे भुसारा व्यापाऱ्यांनी दुकानं उघडण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे मार्केट समिती प्रशासनांची आज व्यापाऱ्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे.
#लढा_कोरोनाचा : बाबा आमटेंची नात उतरली कोरोनाच्या युद्धात
तर पुणे ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी गावपातळीवरील स्वयंघोषित ‘जनता कर्फ्यू’ला चाप लावला आहे. ‘शासनाच्या नियमानुसार, दुकानं सुरू राहितील, कोणताही शासनाच्या आदेशाशिवाय लागू होणार नाही’, असं जिल्ह्याधिकाऱ्यांनी बजावलं आहे. तसंच गावातील क्वारंटाइन सेंटर्समधून सुविधा द्या, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
काहीही झालं तरी शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही ! CM ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
काही ठिकाणी गावातील पुढाऱ्यांकडून बाहेरून येणाऱ्या आणि गावातील लोकांना नाहक त्रास दिला जात असल्याचं समोर आलं आहे. गावातील काही पुढारी हे परस्पर 3 ते 4 दिवसांचे जनता कर्फ्यू जाहीर करत होते. त्यामुळे गावात सर्वच दुकानं बंद पाडण्याचे काम सुरू होते. पुढाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे गावकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वयंघोषित ‘जनता कर्फ्यू’ला बंदी घातली आहे.
काय म्हणता ! कामगारांना पूर्ण पगार देण्याचा नियम सरकारच्या नवीन नियमावलीत नाही…
दरम्यान पुणे जिल्ह्यात 18 मेपर्यंत 159 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा 4177 वर पोहोचला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 211 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

