Share

#लढा_कोरोनाचा : बाबा आमटेंची नात उतरली कोरोनाच्या युद्धात

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणांवर व काम करणाऱ्या डॉक्टरांवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य क्षेत्रात असणाऱ्या खाजगी डॉक्टरांना मदत मागितली होती. तर वैद्यकीय मदतीचं आवाहन केलं होतं. या आवाहनानंतर अनेक डॉक्टर हे या कोरोनाच्या लढाईत मदतीसाठी आले. त्याचप्रमाणे आनंदवनाचे निर्माते बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी या देखील मदतीला धावून आल्या आहेत. याबाबतचे वृत्त ABP माझाने प्रसिद्ध केले आहे.

त्या चंद्रपूर जिल्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाल्या आहेत. शीतल आमटे या स्वतः डॉक्टर असून त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी 2003 साली मिळवली असून त्यानंतर त्या पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. सध्या त्या आनंदवन येथील महारोगी सेवा समिती, वरोरा यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर त्यांनी देखील आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्या म्हणाल्या की, माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पूर्ण वेळ आरोग्याशी संंबंधित काम आनंदवनात महाआरोग्य समिती मार्फत करत होतेच. चीन येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आम्ही सर्वजण ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होतोच, म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर होण्याच्या काही दिवस अगोदरच आम्ही आनंदवनात लॉकडाऊन केला होता.

मी आणि आमच्या आरोग्य चळवळीतील कार्यकर्ते आम्ही सर्वजण या आजाराशी संबंधित जनजागृती करत होतो लोकांना प्रशिक्षित करत होतो. तसेच येथील बऱ्यापैकी भागात आदिवासी भाषा कळत असल्यामुळे शासनाच्या सर्व नियमांची माहिती आम्ही गोंडी आणि अन्य तत्सम भाषेत लोकांपर्यंत पोहचवत होतो. आमचा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येतो. या आजाराचे रुग्ण इथे कमी असले तरी ते वाढू नयेत याकरिता विशेष काळजी घेणे गरजेचे होते. त्याकरिता जेव्हा मला कोविड योद्धा उपक्रमाबाबत कळलं तेव्हा मी सहभागी होण्याचं ठरवलं. त्यानुसार त्याचं ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन मी शुक्रवारी रुजू झाले.

पुढे त्या म्हणाल्या की, इथे मी थेट रूग्ण जरी बघत नसले तरी, या आजाराच्या शिक्षणाबाबतच साहित्य बनविणे, आशा वर्कर ते गावकरी यांच्यामधील कार्यकर्त्यांमार्फत दुवा तयार करणे या सर्वाचा प्रयत्न केला. मला स्वतःला काही आरोग्याबाबतीतील व्याधी आहे पण त्या बाजूला ठेवून आपण समाजासाठी काही तरी केलं पाहिजे म्हणून मी या उपक्रमात सहभागी झाले आहे. आम्ही एक दवंडी तयार केली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल.

दरम्यान सचिवांकडून आलेल्या माहितीनुसार, कोविड योद्धा उपक्रमात सहभागी होण्यासाठी 22 हजारांपेक्षा जास्त लोकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन हजाराांपेक्षा अधिक लोक त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून राज्यातील विविध भागात काम करत आहेत. यामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असली तरी अन्य सेवा देणाऱ्या बऱ्याच लोकांचा समावेश आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!