Share

#corona : सोशल डीस्टंन्सिंगचे नियम पाळून उच्च न्यायालयातील कामकाजास सुरवात करावी !

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर ज्या सार्वजनिक ठिकाणी गर्दी होते अशा ठिकाणी पूर्णपणे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अनेक प्रशासकीय कार्यालयंं देखील बंद ठेवण्यात आली आहेत. तर न्यायालयीन कामकाज देखील बंद ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने उच्च न्यायालयातील जेष्ठ वकिलांनी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांना पत्र लिहित काही ठराविक नियम पाळून न्यायालायीन कामकाजास सुरवात करावी अशी मागणी केली आहे.

#लढा_कोरोनाचा : बाबा आमटेंची नात उतरली कोरोनाच्या युद्धात

आज कोरोनाचा फटका न्यायालयीन कामकाजाला देखील बसला आहे. अनेक याचिका व खटले हे येऊन पडले आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर भविष्यात या साऱ्याचा ताण येईल. त्यापेक्षा काही सोशल डीस्टंसिंगचे नियम पाळून कामकाजाला सुरवात करावी. तसेच कामाचे तास देखील वाढवावेत. जेणेकरून भविष्यातील काही ताण हा कमी होईल, असे पत्रात लिहिले आहे.

काहीही झालं तरी शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही ! CM ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

उच्च न्यायालयातील कामकाज आठवड्यातील काही दिवस बंद असते. त्यामुळे सर्वच खटल्यांवर सुनावणी घेतली जात नाही. केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जाते. मात्र अशाने भविष्यात न्यायालयावर ताण येऊ शकतो.

काय म्हणता ! कामगारांना पूर्ण पगार देण्याचा नियम सरकारच्या नवीन नियमावलीत नाही…

यासाठी एखाद्या कोर्टरुममध्ये वकील आणि न्यायमूर्ती यांच्यात 15 ते 20 फुटांचे अंतर राखले जाते. एखाद्या सुनावणीसाठी कोर्टात केवळ दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनाच परवानगी देण्यात यावी. याशिवाय कोर्टात प्रवेशासाठी ई-पास बंधनकारक करण्यात यावा, अशा काही उपाययोजना करून कामकाजाला सुरवात करावी अशी मागणी ज्येष्ठ वकिलांनी केली आहे.

#Lockdown_4.0 : असा असणार पुणे जिल्ह्यातील शहरी-ग्रामीण भागात लॉकडाऊन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!