Share

“भडकाऊ भाईजानला पोलिसांनी फटकवला असेल चांगला”, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अफवा पसरवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक विरोधात (Vikas Pathak) धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आज हिंदुस्थानी भाऊला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भडकाऊ भाईजानला फटकावला असेल चांगला, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी ट्विट करत दिली.

रुपाली पाटील ट्विटमध्ये म्हणतात, ‘विकास फाटक फटकवला असेल चांगला ? कुणी कायदा मोडेल तर महाराष्ट्र पोलीस त्याला कस सोडेल? “भडकाऊ भाईजान”‘, असे रुपाली पाटील ट्विट करत म्हणाल्या.

३१ जानेवारी रोजी युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊने परीक्षेबाबत अफवा पसरवल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात म्हणून आंदोलन केले होते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!