Share

गोरगरीब नागरिकांपेक्षा जनावरे महत्वाची आहेत का? जलील यांचा प्रशासनावर गंभीर आरोप!

Published On: 

औरंगाबाद: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिटमिटा येथे गट क्र. ३०७ मध्ये २० हेक्टर जागा जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आली होती. २०१९ मध्ये विभागीय आयुक्तांनी मिटमिटा येथील जागा अचानकपणे सफारी पार्कला देऊन घरकुलसाठी नवीन जागा शोधण्याचे फर्मान जारी केले होते. अगोदर घरकुल योजनेतंर्गत घर बांधण्यासाठी नविन जागा निश्चित करुन मग मिटमिटा येथील जागा सफारी पार्कला द्यायला हवी होती. परंतु गोरगरीब नागरीकांपेक्षा जनावरे महत्वाची आहेत का ? असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी जिल्हा प्रशासनावर केला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत गोरगरीब नागरीकांना लाभ मिळावे यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाने घटक क्र. ४ खाजगी भागीदारी मध्ये परवडणारे गृहनिर्माण म्हणजे फ्लॅट सिस्टीमला प्राधान्य देवून ५२८५६ लाभार्थीयांचे वर्ष २०१६ मध्ये अर्ज जमा केले होते. घरकुल योजनेत घर मिळावे यासाठी जानेवारी २०१९ मध्ये मौजे मिटमिटा येथे गट क्र. ३०७ मध्ये २० हेक्टर जागा जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आली होती. औरंगाबाद महापालिकेच्या वतीने मिटमिटा येथे शंभर एकर जागेत प्राणी संग्रहालय उभारण्यात येत आहे. आता यामध्ये आणखी जागा मिळवून वाघ आणि सिंह पाहण्यासाठी सफारी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

मुक्त वातावरणात वावरणाऱ्या वाघ आणि सिंहाना पर्यटकांना बंदिस्त गाडीतून पाहता येईल. गटनंबरमधील २० हेक्टर जमीन ही प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी मंजूर केलेली आहे. सफारी पार्क जवळच घरकुल योजना राबविणे योग्य ठरणार नाही. यामुळे इतर ठिकाणी घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेने केली आहे. महानगरपालिकाने मनपा ठराव क्र. १००३ नुसार २२ फेब्रुवारी २०१९ रोजी मिटमिटा येथे फक्त ४२०० सदनिका बांधण्याचा प्रस्तावास मंजूरी सुद्धा दिली होती.

घरकुलसाठी मौजे तिसगाव, चिकलठाणा, कांचनवाडी व सुंदरवाडी येथे विविध गटात शासकीय जागा निश्चित करुन महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या परवानगीकरिता वर्ष २०२० मध्ये सविस्तर प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु आजपर्यंत जागाच देण्यात आलेली नाही. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!